जर तुम्ही एखाद्या पाळीव प्राण्याला प्रेमाने जवळ केले, तर तो तुमच्यावरही जीवापाड प्रेम करतो. याचे एक उत्तम उदाहरण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळच्या निपाणीजवळील यमगर्णी गावात पाहायला मिळाले आहे.
गावातील भाविक ज्ञानेश्वर कुंभार यांच्याकडे ‘महाराज’ नावाचा एक श्वान आहे. या श्वानाने 225 किलोमीटर पायी चालत पंढरपूरच्या वारीत भाग घेतला. मात्र, गर्दीत तो हरवला. ज्ञानेश्वर कुंभार आपल्या ‘महाराज’ची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो घरी परतल्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. या कामगिरीनंतर महाराजची गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
श्वानाची पंढरपूरची पायी वारी:
आपण पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांना चालत पायी वारी करताना पाहिलं आहे. पण, या महाराज श्वानानेही 225 किलोमीटर पायी वारी केली आहे. पंढरपुरात गेल्यानंतर तो गर्दीत चुकला. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी हा श्वान घरी परतल्यानंतर गावात त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. कुंभार कुटुंबीयांनी त्याला हार घालून पूजन केले. ज्ञानेश्वर कुंभार गेली 30 वर्षे कोल्हापुरातील कागल तालुक्यातील नानीबाई चिखली ते पंढरपूर अशी पायी वारी करत आहेत. त्यांचा ‘महाराज’ नावाचा पाळीव श्वान नेहमीच गावातील मंदिरात जातो. यंदा विठ्ठलाच्या दर्शनासाठी 6 जुलैला गावातून निघालेल्या पायी दिंडीत ‘महाराज’ हा श्वानही सहभागी झाला आणि पंढरपुरच्या दिशेने रवाना झाला. पण, पंढरपुरात लाखोंच्या गर्दीत तो हरवला.
गावी परतलेल्या श्वानाचं पूजन अत्यंत आनंदाने करण्यात आलं. कुंभार कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या श्वानाला हार घालून पूजन केलं. गावकऱ्यांनी त्याच्या स्वागतासाठी जंगी मिरवणूक काढली, ज्यात श्वानाला विशेष मान दिला गेला. या पूजनात श्वानाला प्रेमाने आणि आदराने साजरा करण्यात आलं, ज्यामुळे सर्वांनी त्याच्या परतण्याचा आनंद साजरा केला.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group