मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला रायगड जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात तांत्रिक पडताळणी सुरू केली गेली आहे. आज महसूल पंधरवड्याच्या अंतर्गत पहिला दिवस माझी बहिण लाडकी बहिण योजनेसाठी होता. आजपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 33 हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यात या योजनेसाठी 3 लाख 45 हजार 734 पात्र महिलांनी अर्ज केला आहे. तालुकास्तरावर शिबीरांचे आयोजन करून पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत व महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी वेळोवेळी आढावा घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष स्थापन केलेले आहेत. तिन शिफ्टमध्ये निर्धारित निकषानुसार अर्जांची छाननी आणि अंतिम करण्याच्या कार्यपद्धतीनुसार काम सुरू आहे. उर्वरीत ऑनलाईन प्राप्त अर्जावर तालुकानिहाय कार्यवाही सुरू आहे. नव्याने प्राप्त होणारे ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करण्याचे काम गावपातळीवर सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजूरी करण्याबाबतही कार्यवाही चालू आहे.

या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी चालू आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा केला जात आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यास निश्चितपणे मदत होईल. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग आहे, त्यामुळे याबाबत कुठल्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नका, असे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version