पॅरिस ऑलिम्‍पिक २०२४ मध्ये विनेश फोगाटने एका पाठोपाठ एक या प्रमाणे तीन सामने जिंकले आणि थेट फायनलमध्ये प्रवेश केला होता. यामुळे संपूर्ण भारतभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अंतिम सामन्यात पोहोचल्‍याचा अर्थ होता की, भारत आणि विनेश फोगाटला पदक पक्‍के झाले होते.

मात्र १००/१५० ग्राम वजन वाढल्यामुळे महिलांच्या ५० किलो वजनी गटातून कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले आहे. हा भारतासाठी सर्वात मोठा धक्का आहे. या निर्णायामुळे सुवर्णपदक जिंकण्याचं भारताचं स्वप्नही भंगलं आहे. स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धकाचं वजन दोन्ही दिवशी त्यांच्या वजनश्रेणीतच असणं आवश्यक असतं.

दरम्यान, या निर्णयानंतर आता पंतप्रधान मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

विनेश तू भारताचा गौरव आहेस. शिवाय तू प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तुझं अपात्र ठरवलं जाणं हे वेदनादायी आहे. ही बातमी ऐकून मला जे दुख: होतं आहे, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढे बोलताना, आव्हान स्वीकारणं हा नेहमीच तुझा स्वभाव राहिला असून तू नक्कीच पुनरागमन करशील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्व तुझ्या पाठिशी आहोत, असेही ते म्हणाले.

ऑलिंपिक महासंघ काय म्हणाले?

यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक समितीनेही परिपत्रक जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट’, असं भारतीय ऑलिम्पिक समितीने म्हटलं आहे. याशिवाय भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे.

फायनलमध्ये प्रवेश करण्याआधी विनेश फोगटने महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. आंतरराष्ट्रीय कुस्तीतील जपानी कुस्तीपटूचा हा पहिलाच पराभव होता, ज्यामुळे विनेशचा विजय आणखीनच विशेष झाला होता.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version