Wankhede stadium will open for tourist

कालच महाराष्ट्र राज्याचे टुरिझम मिनिस्टर श्री. आदित्य ठाकरे यांनी MCA (Mumbai Cricket Association) यांच्याकडे वानखेडे स्टेडियम हे टुरिस्टसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती ज्याच्यामुळे क्रिकेट स्टेडियमचा अनुभव येथे पर्यटकांना घेता येईल.

त्यांच्या या मागणीला मुंबई क्रिकेट बोर्डाने हिरवा कंदील दिला असून लवकरच जगभरातील आणि आपल्या पर्यटकांना व क्रिकेट चाहत्यांना याचा आनंद घेता येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अजिंक्य नाईक आणि विहांग सरनाईक यांनी आदित्य ठाकरेंची मागणी स्वीकारली आहे. लवकरच यावर काम सुरु होऊन पर्यटक व क्रिकेट चाहत्यांना स्टेडियमचा जवळून आनंद घेता येणार आहे.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version