डिजिटल युगाचा बोलबाला असताना आता केंद्र सरकारने RTO कागदपत्रांसंदर्भात अधिसूचना जरी केली असून आता अंमलबजावणीच केलेली आहे. आता लायसन्स, RC तसेच PUC व इतर गाडीच्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी बाळगली तरी दंड बसणार नाही.

यापूर्वी पोलिसांनी गाडी अडवल्यावर मूळ कागदपत्रे दाखवणे बंधनकारक होते. परंतु केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार १ ऑगस्ट २०२० पासून लायसन्स, इन्शुरन्स, RC बुक, PUC, फिटनेस सर्टिफिकेट आदी कागदपत्रे डिजिटल लॉकर किंवा एम-परिवहन या सरकारच्या ऍपवरती सेव्ह करून ठेवू शकता.

पोलीस किंवा RTO ने अडविल्यानंतर आपण ती ई स्वरूपातील कागदपत्रे दाखवू शकता. परंतु तुम्ही जर कागदपत्रे ई-फॉर्ममध्ये बाळगली नसतील तर ओरिजिनल लायसन्स स्वतःकडे असणे बंधनकारक आहे.

डिजिटल लॉकरमध्ये कागदपत्रे कशी सेव्ह करावीत?

गुगल स्टोअरवरती जाऊन डिजिटल लॉकर किंवा एम-परिवहन ऍप इन्स्टॉल करा. वैयक्तिक माहितीद्वारे लॉगईन केल्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असेल तर आपली सर्व कागदपत्रे ई-लॉकरला ठेवता येईल. एम-परिवहन ऍपवरती आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक नाही.

याचा वाहनचालकांना कसा फायदा होणार?

  • डिजिटल लॉकर सेवा असल्याने मूळ कागदपत्रे सांभाळण्याची गरज नाही.
  • कागदपत्रे गहाळ होण्याचा धोका नसेल.
  • हि सेवा मोफत उपलब्ध आहे.
  • पोलिसांनादेखील पाहण्यासाठी उपयुक्त ऍप.
  • मोबाईल ऍपमध्ये हि कागदपत्रे कायमस्वरूपी राहू शकतात त्यामुळे जरी मोबाईल हरवला किंवा खराब झाला तरी इतर मोबाईलमध्ये लॉगईन केल्यानंतर कागदपत्रे पाहू शकता.

अँड्राईड ऍप इन्स्टॉल करा:

DigiLocker Android App
mParivahan Android App
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version