आज २ ऑक्टोबर २०२० सकाळी १०:०० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे उदघाटन पार पडले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उदघाटनाला ऑनलाईन उपलब्ध होते.
महागाव येथे उदघाटनप्रसंगी स्वतः जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार विधान परिषद श्री.अनिकेत तटकरे साहेब रायगड जिल्हाअधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्येकारी आधिकारी जिल्हा परिषद मा. डॉ. किरण पाटील, तळा तहसीलदार मा. कानासेट्टी, तळापंचायत समिती सभापती उपस्थित होते.
त्याव्यतिरिक्त महागावचे सरपंच सौ. सुषमा कजबले, विठोबा साबळे, महागांव पोलीस पाटील श्री कमलाकर मांगले, महागांव हायस्कुलचे मुख्यध्यापक श्री धारूरकर सर आदी मान्यवर तसेच महागाव पंचक्रोशीतील श्री.अनंत वारे, श्री. दत्तात्रय मांगले, श्री.गंगाराम साळवी, श्री.संतोष वारे, श्री.प्रसाद साळवी, श्री.किरण साळवी,, कु. अक्षय प्रभाकर मांगले, कु.ऋषीकेश मांगले व इतर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
दरम्यान महागांव गावचे श्री. गणेश साळवी यांनी कु. हर्षल गणेश साळवी याचे वाढदिवसाचे औचित्य साधून व वडील कै. सदाशिव बाबाजी साळवी यांचे स्मृती पित्यर्थ महागांव आरोग्य केंद्रास व्हिलचेअर अर्पण केली.