रोहा तालुक्यात शासकीय किंवा खाजगी रग्णालयातील गरजू लोकांना तात्काळ रक्त मिळावे म्हणून रोहा तालुक्यातील नागरिकांनी हल्लीच पालकमंत्री कु. आदिती तटकरेंची भेट घेतली होती.
यासाठी आदिती तटकरेंनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रोहा शहर तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना रक्तसाठा केंद्रासारखी आवश्यक सुविधा आता उपलब्ध झाली आहे.
याबाबतीत स्वतः आदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे.
रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तसाठा केंद्रास आज राज्य शासनाने मंजूरी दिली आहे.
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 6, 2020
या रक्तसाठा केंद्रासाठी अन्न व औषध विभागाकडून एक वैद्यकीय अधिकारी व एक रक्तपेढी तंत्रज्ञ अशा दोन अधिकारी-कर्मचाऱ्याची नियुक्ती तात्काळ करण्यात आली आहे.
या त्वरित झालेल्या रक्तसाठा केंद्रासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून 1 वैद्यकीय अधिकारी व 1 रक्तपेढी तंत्रज्ञ अशा दोन अधिकारी-कर्मचाऱ्याची नियुक्ती तात्काळ करण्यात आलेली आहे.
आपली मागणी त्वरित मंजूर झाल्यामुळे रोहा तालुका व इतर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून पालकमंत्री अदिती तटकरेंचे आभार व्यक्त केले आहेत.