येत्या गुरुवारी दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त रत्नागिरी पोलिसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोनाच्या काळात रक्ताची मागणी वाढत असून अशा स्तुत्य उपक्रमाचेनागरिकांनी स्वागतच केलेले आहे.

रत्नागिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ९:०० ते :दुपारी १:०० पोलीस मुख्यालय, कॉन्फरन्स हॉल रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल, भारतीय जैन संघटना रत्नागिरी, माजी एन.सी.सी. कॅडेट्स रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण तसेच इतर आजारी रुग्णांना रक्ताचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून शासकीय रुग्णालयांच्या मागणीनुसार रत्नागिरी जिल्हा रक्तपेढीच्या साहाय्याने सोशल डिस्टंसींग राखून रक्तदानाची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

इच्छुक रक्तदान करणाऱ्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी.

  • महेंद्र गुंदेचा- ९४२२४२९५९९
  • प्रवीण घोसाळकर- ९८६०११४८०८
  • जयदीप परांजपे- ९६७३११९७५०
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version