फोर्ब्स’ने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची हल्लीच एक यादी प्रसिद्ध केली होती आणि त्यात सध्याची 1.8 अब्ज डॉलर्स संपत्ती असणाऱ्या शिक्षकाचाही समावेश आहे. एका शिक्षकाकडे असलेली इतकी रक्कम वाचून कदाचित आपल्यालाआश्चर्य वाटत असेल परंतु मेहनत आणि जिद्दीच्या चिकाटीवर त्याने नाव आणि पैसे कमावले आहेत.
केरळ मधील कन्नूर जिल्ह्यातील अझिकोड या ठिकाणच्या असणाऱ्या त्या शिक्षकाचे आई-वडीलसुद्धा शिक्षकच असल्यामुळे लहानपणापासून उत्तम संस्कार झाले. त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि तो एका MNC कंपनीमध्ये नोकरी करू लागला.
एकदा सुट्टीनिमित्त तो शिक्षक बँगलोरला गेला होता त्यावेळेस त्याचे मित्र CAT परीक्षेची तयारी करत होते. याचे गणित चांगले असल्याने त्याने त्याच्या मित्रांना मार्गदर्शन केल्यामुळे ते मित्रसुद्धा परीक्षेत पास झाले.
आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगितल्यामुळे doubts क्लीअर झाले होते. त्यामुळे त्या मित्रांनी त्याला ट्युशन सुरु करण्याचा आग्रह केला आणि त्याने सुद्धा त्याबाबतीत विचार करून अखेर नोकरी सोडून संपूर्ण लक्ष ट्युशन घेण्यावरती केले.
शिकवण्याच्या सोप्या पद्धतीमुळे तो कमी वेळेत लोकप्रिय झाला. एका वेळी तब्बल २५००० विद्यार्थ्यांची त्याने ट्युशन घेतली. मागणी वाढू लागली आणि त्याला अनेक शहरात ट्युशनसाठी जावे लागत असल्यामुळे वेळही जास्त लागत होता आणि पैसेही.
त्यामुळे डोक्यात एक संकल्पना आली आणि एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल म्हणून एक वेबसाईट सुरु केली आणि त्यावरती काही व्हिडिओ अपलोड केले. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत गेला पालकसुद्धा या योजनेला आकर्षित झाले.
अखेरीस त्याने एक ऍप चालू केला त्याचे नाव BYJU’S. या ऍपच्या माध्यमातून इयत्ता 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सर्व विषयांचे शिक्षण घरबसल्याच मिळू लागले. शिक्षकाचे नाव बायजु रवींद्रन. अशाप्रकारे त्या शिक्षकाला यशाच्या शिखरावरती नेवून ठेवले.
स्वतःवरील विश्वास, मेहनत, जिद्द आणि अनोख्यापद्धतीने शिकवणी घेऊन BYJU’S भारतासह जगभरात ट्युशन देणारी महत्वाची कंपनी ठरली.