॥ अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात ॥
(पठण करताना ओळीवर टॅप करा)
अमृताची गोडी तुझ्या भजनात ।
मनाचा विसावा सुखी संसारात ॥
भजनी रंगावे जग विसरावे ।
रामनाम घ्यावे चिपळ्यांची साथ ॥ १ ॥
माझा पांडुरंग ऐकतो अभंग ।
भक्तिरंगी दंगा नाचे कीर्तनात ॥ २ ॥
नाव तुझे देवा केशवा-माधवा ।
कोणतेही ठेवा, गोडवा तयांत ॥ ३ ॥