You are currently viewing सुंदर ते ध्यान उभे विटेवरी (Sundar te dhyan ubhe vitevari)

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी (Sundar te dhyan ubhe vitevari)

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटेवरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान ||

तुळसी हार गळा कांसे पितांबर
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान
आवडे निरंतर हेची ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान || 1 ||

मकरकुंडले तळपती श्रवणी
मकरकुंडले तळपती श्रवणी
आ आ आमकरकुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान || 2 ||

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुखपाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान || 3 ||


अभंग चाल ऐका:

चाल क्र १:

चाल क्र २: