॥ तुकाराम तुकाराम नाम घेता ॥
(पठण करताना ओळीवर टॅप करा)
तुकाराम तुकाराम….(२)
नाम घेता कापे यम…..(३)….॥धृ.॥
धन्य धन्य तुकोबा समर्थ….(२)
तेणे केला हा पुरूषार्थ….(२)
तुकाराम तुकाराम….(२)
नाम घेता कापे यम…..(३)….॥१.॥
जळी दगड्यासहीत वह्या….(२)
तारियेल्या जैश्या लाह्या….(२)
तुकाराम तुकाराम….(२)
नाम घेता कापे यम…..(३)….॥२.॥
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा….(२)
तुका विष्णू नोहे दुजा…..(२)
तुकाराम तुकाराम….(२)
नाम घेता कापे यम…..(३)….॥३.॥