॥ नाम गातो तुझे रे गिरिधारी ॥
(पठण करताना ओळीवर टॅप करा)
हाती घेऊन आलो एक तारी… (२)
नाम गातो तुझे रे गिरिधारी… (३) ॥धृ.॥
पतीत पावन अनाथांच्या नाथा… (२)
चरणावरी रे तुझ्या ठेविला माथा… (२)
आळवितो मी तुजला आता… (२)
तुजला आता…
देई दर्शन श्याम मुरारी… (२)
नाम गातो तुझे रे गिरीधारी… ॥१॥
हाती घेऊन आलो एक तारी… (२)
नाम गातो तुझे रे गिरिधारी… (३) ॥धृ.॥
नाम तुझे ते घेता तरला… (२)
वाल्या कोळी वाल्मिक झाला… (२)
भक्तजणांचा उद्धार केला… (२)
उद्धार केला…
नेई तारून आलो दरबारी… (२)
नाम गातो तुझे रे गिरिधारी… ॥२॥
हाती घेऊन आलो एक तारी… (२)
नाम गातो तुझे रे गिरिधारी… (३) ॥धृ.॥
महिमा तुझा तो अपरंपार… (२)
वसविले तू पंढरपूर… (२)
चोख्यासाठीच झाला महार… (२)
झाला महार…
तिन्ही लोकात आहे तुझी वारी… (२)
नाम गातो तुझे रे गिरिधारी… ॥३॥
हाती घेऊन आलो एक तारी… (२)
नाम गातो तुझे रे गिरिधारी… (३) ॥धृ.॥
नाम गातो तुझे रे गिरिधारी” (Naam Gaato Tujhe Re Giridhari) हा भगवान श्रीकृष्ण आणि विठ्ठलाच्या चरणी संपूर्ण शरणागती व्यक्त करणारा एक अत्यंत भावपूर्ण मराठी अभंग/भजन आहे.
या भजनात भक्त हातात एकतारी घेऊन देवाच्या नामाचा गजर करत दरबारात हजर होतो. भगवंताला ‘पतित पावन’ व ‘अनाथांचा नाथ’ म्हणत तो दर्शनाची आळवणी करतो. वाल्या कोळ्याचा महर्षी वाल्मिकी कसा झाला आणि संत चोखामेळा यांच्या प्रेमाखातर भगवंताने काय काय रूपे घेतली, या संतांच्या उद्धाराच्या कथांचे स्मरण करून देव आपल्या भक्तांसाठी कसा धावून येतो, याचे सुंदर वर्णन यात केले आहे.