You are currently viewing शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान (Shankarala Majhya Awadte Belache Paan)

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान (Shankarala Majhya Awadte Belache Paan)

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान
महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ॥

गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा
पायात खडावा छान, आवडते बेलाचे पान ॥

जटेतुन वाहे झुळ झुळ गंगा
डोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान ॥

महादेवाच्या हातात डमरु त्रिशूल
कपाळाला भस्म शोभे छान, आवडते बेलाचे पान ॥

बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती
शोभून दिसतोया छान, आवडते बेलाचे पान ॥

जगाच्या कल्याणा, हलाहल प्राशन
नीलकंठ शोभतो छान, आवडते बेलाचे पान ॥


चाल ऐका: