You are currently viewing ॥ श्री राम स्तुती ॥ (|| Shree Ram Stuti ||)

॥ श्री राम स्तुती ॥ (|| Shree Ram Stuti ||)

  • Post author:
  • Post category:Mantra

॥ श्री राम स्तुती ॥

(वाचताना किंवा म्हणताना ओळीवर टॅप करा)

संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी । प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १ ॥
मन हे विकारी स्थिरता न ये रे । त्याचेनि संगे भ्रमतें भले रें । अपूर्व कार्या मन हे विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ २ ॥
मायाप्रपंचीं बहु गुंतलों रे । विशाळ व्याधीमधें बांधलो रे । देहाभिमानें अति राहवेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३ ॥
दारिद्र्यदुःखे बहु कष्टलो मी । संसारमायेतचि गुंतलो मी । संचित माझे मजला कळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ४ ॥
लक्ष्मीविलासी बहु सौख्य वाटे । श्रीराम ध्यातां मनि कष्ट मोठे । प्रपंचवार्ता वदता विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ५ ॥
अहोरात्र धंदा करितां पुरेना । प्रारब्धयोगें मज राहवेना । भवदुःख माझें कधिही टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ६ ॥
तीर्थासि जातां बहु दुःख वाटे । विषयांतरी राहुनी सौख्य वाटे । स्वहीत माझें मजला कळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ७ ॥
मी कोठुनि कोण आलो कसा हो । स्त्रीपुत्रस्वप्नातचि गुंतलो हो । ऐसें कळोनी मन हे विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ८ ॥
असत्य वाक्यांनि मुकाच झालो । अदत्तदोषें दुःखी बुडालो । अपूर्व करणी कशी आठवेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ९ ॥
अब्रह्ममूर्ती भज रामसिंधू । चैत्यन्यस्वामी निजदीनबंधू । अभ्यंतरी प्रेम मनीं ठसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १० ॥
विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं । कुळाभिमानें पडलों प्रवाहीं । अशांतुनी दूर कधी कळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ११ ॥
विषयीं जनांनी मज आळवीले । प्रपंचपाशांतचि बूडविले । स्वहीत माझें मजला दिसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १२ ॥
नरदेहदोषां वर्णू किती रे । उच्चर माझें मनि वाटती रे । ललाटरेषा कधि पालटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १३ ॥
मजला अनाथ प्रभु तूंचि दाता । मी मूढ की जाण असेंचि आतां । दासा मनीं आठव वीरसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १४ ॥

संसारसंगे बहु शीणलों मी ।

कृपा करी रे रघुराजस्वामी ।

प्रारब्ध माझे सहसा टळेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १ ॥

मन हे विकारी स्थिरता न ये रे ।

त्याचेनि संगे भ्रमतें भले रें ।

अपूर्व कार्या मन हे विटेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ २ ॥

मायाप्रपंचीं बहु गुंतलों रे ।

विशाळ व्याधीमधें बांधलो रे ।

देहाभिमानें अति राहवेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३ ॥

दारिद्र्यदुःखे बहु कष्टलो मी ।

संसारमायेतचि गुंतलो मी ।

संचित माझे मजला कळेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ४ ॥

लक्ष्मीविलासी बहु सौख्य वाटे ।

श्रीराम ध्यातां मनि कष्ट मोठे ।

प्रपंचवार्ता वदता विटेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ५ ॥

अहोरात्र धंदा करितां पुरेना ।

प्रारब्धयोगें मज राहवेना ।

भवदुःख माझें कधिही टळेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ६ ॥

तीर्थासि जातां बहु दुःख वाटे ।

विषयांतरी राहुनी सौख्य वाटे ।

स्वहीत माझें मजला कळेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ७ ॥

मी कोठुनि कोण आलो कसा हो ।
स्त्रीपुत्रस्वप्नातचि गुंतलो हो ।

ऐसें कळोनी मन हे विटेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ८ ॥

असत्य वाक्यांनि मुकाच झालो ।

अदत्तदोषें दुःखी बुडालो ।

अपूर्व करणी कशी आठवेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ९ ॥

अब्रह्ममूर्ती भज रामसिंधू ।

चैत्यन्यस्वामी निजदीनबंधू ।

अभ्यंतरी प्रेम मनीं ठसेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १० ॥

विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं ।

कुळाभिमानें पडलों प्रवाहीं ।

अशांतुनी दूर कधी कळेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ११ ॥

विषयीं जनांनी मज आळवीले ।

प्रपंचपाशांतचि बूडविले ।

स्वहीत माझें मजला दिसेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १२ ॥

नरदेहदोषां वर्णू किती रे ।

उच्चर माझें मनि वाटती रे ।

ललाटरेषा कधि पालटेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १३ ॥

मजला अनाथ प्रभु तूंचि दाता ।

मी मूढ की जाण असेंचि आतां ।

दासा मनीं आठव वीरसेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १४ ॥