Skip to content
आले रे गणपती आज दारी रे
बाप्पा मोरया आनंद झाला माझ्या मना भारी रे॥
सजले मखर हे, फूल माळ ओवली
उजळून आरती, तबकात ठेवली।
मोदकही आवडीचा गोडी त्याची न्यारी रे
आले रे गणपती आज दारी रे॥ १॥
टाळ झांजा मृदुंगाचा गजरही घुमला,
बालगोपाळांचा मेळा नाचा मध्ये रमला।
देवा गणेशाचा घोष जय जय भारी रे
आले रे आज गणपती दारी रे॥ २॥
English Lyrics:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste