You are currently viewing दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी (गवळण) (Dahi ghya koni na dudh ghya koni)

दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी (गवळण) (Dahi ghya koni na dudh ghya koni)

  • Post author:
  • Post category:Gavlani

दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी
दही माझं होण्याचं बिगर पाण्याची,
बाई बाई बिगर पाण्याच (1)

गाई म्हशीनी भरलाय गोठा
दह्या दुधाचा नाही हो तोटा
आता खोट नाही बोलायचं (2)

तुमच्या गावाला गवळण आली
दही दुध विकण्याची मला लयी घाई
आता खोट नाही बोलायचं (3)

एका जनार्दनी गवळण राधा
आमचा कृष्ण नाही हो साधा
त्याच्या भक्ती ला लागायचं
आता खरंच बोलायचं बिगर पाण्याचं
ग बाई बाई बिगर पाण्याचं (4)



English Lyrics: