You are currently viewing गवळण- शालू माझा गं रंगाने भिजला (Shalu majha ga rangane bhijala)

गवळण- शालू माझा गं रंगाने भिजला (Shalu majha ga rangane bhijala)

  • Post author:
  • Post category:Gavlani

काय करावे या हरीला |
शालू माझा गं रंगाने भिजला || धृ ||

मी आजच नवा काढला |
किती हौसेने नेसायला
शालू माझा गं रंगाने भिजला || १ ||

सासू विचारील मजला |
का गेलीस रासक्रिडेला
शालू माझा गं रंगाने भिजला || २ ||

असा किती छळसी भक्ताला
नाम आत्म्याचरणी रंगला
शालू माझा गं रंगाने भिजला || ३ ||


गवळण चाल ऐका: