You are currently viewing राधे तुझ्या कानात झुंबर वाऱ्याने हलतंय गं (Radhe Tujya Kanat Zumbar Varyane haltay ga))

राधे तुझ्या कानात झुंबर वाऱ्याने हलतंय गं (Radhe Tujya Kanat Zumbar Varyane haltay ga))

  • Post author:
  • Post category:Gavlani

राधे तुझ्या कानात
झुंबर वाऱ्याने हलतंय गं
झुंबर वाऱ्याने हलतंय गं
कान्हा गोड गोड बोलतंय गं !!धृ!!

घागर घेऊनी मथुरेशी जाता
आड रस्त्यामधी कान्हा उभा होता….
राधे तुझ्या कानात !!1!!

दहिदुध घेऊनी मथुरेशी जाता
आड रस्त्यामधी कान्हा उभा होता….
राधे तुझ्या कानात !!2!!

एका जनार्दनी गौळण राधा
नको लागू कान्हाच्या नादा….
राधे तुझ्या कानात !!3!!


गवळण चाल ऐका: