कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून हो हो ..
घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून घागर गेली फुटून
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून ||
पाचेची न्हानी गुलाबाचं पानी
न्हानित नाहते बसून हो हो ..
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून… ||1||
भिंती आड़ चढूनी आला माज्या जवडी
वाकुनी पाहतो दडून हो हो ..
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्या कड़े पाहू नकोरे
माझी घागर गेली फुटून… ||2||
एका जनार्धानी प्रीतिची राधा
हर्षाने चालली जपून हो हो ..
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून… ||3||
घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून घागर गेली फुटून
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून ||