You are currently viewing घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे

  • Post author:
  • Post category:Abhang

घेई घेई माझे वाचे |
गोड नाम विठोबाचे || १ ||

डोळे तुम्ही घ्यारे सुख |
पाहा विठोबाचे मुख || २ ||

तुम्ही आइका रे कान |
माझ्या विठोबाचे गुण || ३ ||

मन तेथे धाव घेई |
राही विठोबाचे पायी || ४ ||

तुका म्हणे जीवा |
नको सोडू या केशवा || ५ ||



English Lyrics: