Skip to content
रखुमा माझी पेरणी करी
माझा पांडूरंग नांगर धरी
माझी शेती ही पंढरी || धृ.||
अठरा धान्य मीच पिकवितो
चोर लूटारूंचे घर मी भरतो
निसर्गाशी सदा झगडतो चिंता माझ्या उरी
माझी शेती ही पंढरी ||1||
मजूर माझा भाऊ धाकटा कधी होणार नीटनेटका (2)
कष्ट करूनी सदा भाकितो संसाराच्या घरी
माझी शेती ही पंढरी ||2||
धान्य पेरीले बहू मोलाचे पंचतत्त्वे तया रक्षिले
तुका म्हणे जाऊ पाहाया वैकुंठीचा हरी
रखुमा माझी पेरणी करी ||3||
अभंग चाल ऐका:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste