You are currently viewing कन्हैया लागला तुझा रे छंद मला (Kanhaiya lagla tujha re chand mala)

कन्हैया लागला तुझा रे छंद मला (Kanhaiya lagla tujha re chand mala)

  • Post author:
  • Post category:Gavlani

कन्हैया लागला
तुझा रे छंद मला
सांग ना बोल ना.. ।।

यमुनेचा तिरी तू येशील का
चोरून भेट मला देशील का
सांग ना बोल ना..
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला ।। १ ।।

मथुरेच्या बाजारी येशील का
चोरून दही दूध खाशील का
सांग ना बोल ना..
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला ।। २ ।।

एका जनार्धनी गौड़न राधा
राधा लागली कृष्णा चा नादा
सांग ना बोल ना..
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला ।। ३ ।।



चाल समजण्यासाठी व्हिडिओ पहा: