Skip to content
अमृताची गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा सुखी संसारात||
भजनी रंगावे जग विसरावे
रामनाम घ्यावे चिपळ्यांची साथ ||
माझा पांडुरंग ऐकतो अभंग
भक्तिरंगी दंगा नाचे कीर्तनात ||
नाव तुझे देवा केशवा-माधवा
कोणतेही ठेवा, गोडवा तयांत ||
अभंग चाल ऐका:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste