जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं…(२)
देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं…(२)
याड लागलं याड लागलं राग लागलं….(२)
देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं…(३)…||धृ.||
हो चंद्र सूर्य डोळं तुझं..
आभाळ हे भालं तुझं..
झुळू झुळू पाणी जणू..
खुलू खुलू चालं तुझं..
हो चंद्र सूर्य डोळं तुझं..
आभाळ हे भालं तुझं..
झुळू झुळू पाणी जणू..
खुलू खुलू चालं तुझं..
तुझ्याविना संसार यो हो sss
तुझ्याविना संसार यो हो
कडूझार सारा…
नाव तुझ घेतलंनि ग्वाड लागलं
देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं…||१||
पांडुरंग हरी…वासूदेव हरी… विठ्ठल विठ्ठल विठ्ठल….(२)
हो डोंगररांगा आकाशी या..
तुझ्या मातीच्या भिवया…(२)
नारळाच्या झावलाया
तुझ्या कानीच्या मासोळ्या
चंद्र भागेचं रिंगण
तुझ्या हातीचं कांगण
शेतातल्या कोंडावणी sss
शेतातल्या कोंडावणी..
मन बांद भारी
गुर जवा चाटी तव्हा ग्वाड लागलं
देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं…(२)…||२||