You are currently viewing आनंद पोटात माझ्या माईना (Anand Potat Majhya Mayina)

आनंद पोटात माझ्या माईना (Anand Potat Majhya Mayina)

  • Post author:
  • Post category:Abhang

हे माझे पत्र त्या धन्याला, वैकुंठवासी रहातो तयाला
पत्राचा मजकूर वाचूनी पाहिला,
भक्तसंकटी धावून आला
ही वेडीवाकुडी सेवा माझी मान्य करूनि प्रभु घेतील काय
आणि अज्ञानी मूढ बालक म्हणुनी हात मस्तकी धरतील काय

हे तुझे भजना तूच कसे करावे अरे ठाऊक मजला नाही
आणि तुझे भजन तूच करून घे कलावान मी नाही
कोणी माना कोणी मानू नका यात अमुचे काय
आणि भगवंताची सर्व लेकुरे एक पीता एक माय

दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
(आता लगीच काय ? ….. लगीच लगीच )
दत्ता दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं (आम्ही येणार ! )
अरे आनंद पोटात माझ्या ….. अरे वाडीला ||

अरे आनंद पोटात माझ्या ….. औदुंबुर ?
नरसोबाची वाडी राहिलीये
अरे आनंद पोटात माझ्या …..
अरे बाबा गाणगापूर …..
(हा तिकडंच जाऊया आपलं !)
अरे आनंद पोटात माझ्या माईना रे माईना ||

आनंद पोटात माझ्या माईना
गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट
या या डोळ्यांची भूक काही जाईना जाईना रे
अरे आनंद पोटात माझ्या माईना ||

रूप सावळं सुंदर गोजिरवाणं हे मनोहर
नजरेस आणिक काही येईना येईना रे
अरे आनंद पोटात माझ्या माईना
नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्‌गुरू प्रेमळ

खेळ खेळिता खेळ पुरा होईना होईना रे
अरे आनंद पोटात माझ्या माईना ||

हंडीबाग पांडुरंग दत्त गारुडी अभंग
या या भजनाची हौस पुरी होईना होईना रे
अरे आनंद पोटात माझ्या माईना ||



English Lyrics: