॥ का रे देवा उशीर लाविला ॥
संत जनाबाई
(पठण करताना ओळीवर टॅप करा)
का रे देवा उशीर लाविला ।
तुझ्यासाठी जीव वेडा झाला ॥ ध्रु ॥
तुझ्यासाठी देवा सोडिले घरदार ।
सोडिले घरदार, मोडीला संसार ॥१॥
तुझ्यासाठी देवा होईन भिकारी ।
होईन भिकारी, करीन तुझी वारी ॥२॥
तुझ्यासाठी देवा राहीन उपाशी ।
राहीन मी उपाशी करीन एकादशी ॥ ३ ॥
जनी म्हणे देवा होईन तुझी दासी ।
होईल तुझी दासी येईन चरणापाशी ॥ ४ ॥