You are currently viewing माझे मनोरथ पूर्ण करि देवा (Majhe manorath purn kara)

माझे मनोरथ पूर्ण करि देवा (Majhe manorath purn kara)

  • Post author:
  • Post category:Abhang

माझे मनोरथ पूर्ण करि देवा।
केशवा न माधवा नारायणा।। धृ ।।

नाही नाही मज आणिक सोयरा।
न करि अव्हेरा पांडुरंगा।। 1 ।।

अनाथांचा नाथ होसी तू दयाळा।
किती वेळोवेळां प्रार्थू आता।। 2 ।।

नामा म्हणे जीव होतो कासावीस।
केली तुझी आस आता तारी।। 3 ।।


अभंग चाल ऐका: