You are currently viewing सुखालागीं करिसी तळमळ ।

सुखालागीं करिसी तळमळ ।

  • Post author:
  • Post category:Abhang

सुखालागीं करिसी तळमळ ।
तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ।।१।।

मग तूं अवघाची सुखरूप होसी ।
जन्मोजन्मींचे दु़ःख विसरसी ।।२।।

चंद्गभागे करितां एक स्नान ।
तुझे दोष पळती रानोरान ।।३।।

लोटांगण घालितां महाद्वारीं ।
कान घरोनि नाचतां गरुडपारीं।।४।।

नामा म्हणे उपमा काय द्यावी ।
माझ्या विठोबाची आलावला घ्यावी ।।५।|



English Lyrics: