Skip to content
तुझिया नामाचा विसर न पडावा ।
ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥ध्रु.॥
सांगितला मंत्र श्रीरामनामाचा ।
सर्वकाळ वाचा हें चि बोले॥१॥
उफराटें नाम वाल्मीक बोलीला ।
तो ही वंद्य केला नारायणें ॥२॥
तुका म्हणे मज तुझा चि भरवसा ।
धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥
English Lyrics:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste