You are currently viewing झाला महार पंढरिनाथ (Zala Mahar Pandharinath)

झाला महार पंढरिनाथ (Zala Mahar Pandharinath)

  • Post author:
  • Post category:Abhang

झाला महार पंढरिनाथ
काय सांगू देवाचि बात ||

नेसला मळिन चिंधोटी
घेतली हातामधी काठी
घोंगडी टाकिली पाठी
करी जोहार दरबारात || 1 ||

मुंडाशात बांधिली चिठी
फेकतो दुरुन जगजेठी
‘दामाजीनं विकलि जी कोठी
त्याचं घ्यावं दाम पदरात || 2 ||

खळखळा ओतिल्या मोहरा
‘घ्या जी मोजून, पावती करा’
ढीग बघून चमकल्या नजरा
शहा घाली बोट तोंडात || 3 ||



English Lyrics: