You are currently viewing बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनीया (Bappacha Gajar Gavuya Sunder Bhajni Ranguniya))

बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनीया (Bappacha Gajar Gavuya Sunder Bhajni Ranguniya))

  • Post author:
  • Post category:Gajar

आली उंदरावरून गणरायाची स्वारी
सज्ज झाली धरणी करण्या स्वागत भारी
गणपती बाप्पा आले घरा दिस सोन्याचा उगवला
तुला पाहुण्या चाकरपाणी जीव माझा आतुरला
बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनीया ||धृ||

केली रंगरंगोटी घरा वाजे सूर सनई चौघडा
सुखद रंगीकोळीने बहरला भातांचा सडा
माटी मखर सजला फळा फुलांनी नटला
बहुप्रेमाने तुला आदरे आसंनी बसवीला ||१||

मन पहिला तुझ्या पूजेचा हार कंठी नवर्तांचा
दुर्वांकुर वाहील्या पदी घेत मोदक नैवेद्याचा
हे गणनाथा तु भाग्य विधाता
जमल्या सारा भजनी मेळा आरती करायला ||२||

दिड पाच सात नऊ अकरा सण होई तुझ्या साजरा
मांगल्याचा सुवास पसरे दाही दिशांना खरा
या विन हराया तुझी गोरी गरी नमवा
गणपती बाप्पा मोरयाने परिसर दुमदुमला ||३||


गजर चाल ऐका: