शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान (Shankarala Majhya Awadte Belache Paan)

  • Post author:
  • Post category:Gajar

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान
महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ॥

गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा
पायात खडावा छान, आवडते बेलाचे पान ॥

जटेतुन वाहे झुळ झुळ गंगा
डोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान ॥

महादेवाच्या हातात डमरु त्रिशूल
कपाळाला भस्म शोभे छान, आवडते बेलाचे पान ॥

बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती
शोभून दिसतोया छान, आवडते बेलाचे पान ॥

जगाच्या कल्याणा, हलाहल प्राशन
नीलकंठ शोभतो छान, आवडते बेलाचे पान ॥


चाल ऐका: