श्रावणबाळ माझा जातो काशीला
बाळ जातो काशीला हो
माय पित्याची घेऊन कावड खांद्याला…
दूध आंधळ्या माय पित्याला
घेऊन निघाला तीर्थयात्रेला
उन्हातान्हातून शोधित वाट
खड्या रस्त्यातून बाळ निघाला
चालून चालून त्याचा जीव दमला….
माय पित्यास तहान लागली
धावत गेला बाळ त्याचपावली
पाण्यामध्ये झरी बुडवली
त्याच क्षणाला किंचाळी आली
हो श्रावण बाळ मुकला प्राणाला….
आंधळेबिचारे आईबाप रडती
अतिदुःखाने प्राण बघ सोडती
आंधळे बिचारे आईबाप रडती
अतिदुःखाने प्राण बघ सोडती
शाप त्यांनी दिलेला घडाला दशरथाला…