गिरिजा पती तु आधी गणपती
ध्यास हा लागलाय तुझा
सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा !!धृ!!
किती आनंद मनाला होतो
एका वर्षाने घरा तु येतो
साऱ्या भक्तांना दर्शन देतो
इडा पिडा ही घेऊन जातो
चाकरमानी गातात गाणी येती गावाला काढून रजा !!२!!
रूप डोळ्यांनी तुझे हे पाहून
दुर्वा फुले ही चरणाशी वाहू
तुझ्या भक्तीत तल्लीन होऊ
मुखी सदा तुझे नाम गाऊ
ही तुम्ही या घरी केली तयारी करायला तुझीच पूजा !!२!!