पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झाला
उंदरावर बैसूनि माझा गणराज आला
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे (२) ||
भाद्रपद मासी चतुर्थीला तुम्ही आले हो गणराया
शमीपत्र आणि दुर्वा आपुली वाहूया तुझिया पाया
मनोभावे आरती करता हर्ष मनी जाहला (२)
उंदरावर बैसूनि माझा गणराज आला
पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झाला
उंदरावर बैसूनि माझा गणराज आला
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे (२) ।। 1 ।।
सकल जनांचा तू कैवारी वाली या विश्वाचा
परशु हाती घेऊन करसी नाश त्या दृष्टांचा
कृपा करा हो आम्हांवरती धावून या रक्षणाला
उंदरावर बैसूनि माझा गणराज आला
पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झाला
उंदरावर बैसूनि माझा गणराज आला
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे (२) ।। 2 ।।
चौदा विद्या सर्व कला ही तुझीच माया
सुख देई आम्हा भक्तां ठेव ही कृपाछाया
मांगल्याचा समृद्धीचा आशिष दे आम्हाला
उंदरावर बैसूनि माझा गणराज आला ।।
पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झाला
उंदरावर बैसूनि माझा गणराज आला ।।
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे (२) ।। 3 ।।