You are currently viewing गवळण- रुतला पायी काटा (Rutla Payi Kata Kanhane Kadhila)

गवळण- रुतला पायी काटा (Rutla Payi Kata Kanhane Kadhila)

  • Post author:
  • Post category:Gavlani

रुतला बाई काटा, या आडवाटा
नंदाचा गं कारटा होता जोडीला
होता जोडीला म्हणून मी आले गोडीला
कसा गोड बोलूनी तु काल काढीला
गं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटा
या आडवाटा नंदाचा गं कारटा होता जोडीला.. ||0|

कोण जाणे का तुझ्याशी प्रीत जडली
वीट तुझा होता रे पण गाठ पडली
मधुर मुरलीचा रे तू स्वर छेडिला,
कसा गोड बोलूनी तु काठा काढीला ||1||

गोकुळीचा राजा तुला म्हणू तरी काय
लाज-लज्जा सोडुनी माझा धरिला तू पाय
किती धीट तू, बाई मी धीर सोडिला
कसा गोड बोलूनी तु काठा काढीला ||2||

अशी रे कशी ही तुझी जादूगिरी
तुझा स्पर्श होता रे मी झाली बावरी
जणू संजीवनीचा तू घडा फोडिला
कसा गोड बोलूनी तु काठा काढीला ||3||


गवळणीची चाल: