You are currently viewing गवळण- ही दिसते गोरी गोरी (Hi diste gori gori)

गवळण- ही दिसते गोरी गोरी (Hi diste gori gori)

  • Post author:
  • Post category:Gavlani

ही दिसते गोरी गोरी
हिच्या घागर डोईवरी
निघाली पाण्या यमुनातिरी !!ध्रु!!

गवळ्याची पोर आली एकटी एकटी
जल भरण्याचे निमित्त काढुनी
आले यमुनेतिरी श्रीहरी !!१!!

तुझं नाव शोभते ग राधा
मी दिसतो तुला ग साधा
जाऊनी सांगते यशोदेला
खोड्या करितो हा भारी भारी !!२!!

एका जनार्दनी पूर्ण कृपेने
संगत नाही बरी
सांभाळ यशोदे तुझ्या हरीला
खोड्या करितो हा भारी भारी !!३!!


गवळण चाल ऐका: