Skip to content
श्रीहरीsss माधवाsss मोहनाsss
नको करू माझी मस्करी देवा
नको करू माझी मस्करी…..||धृ.||
तुझ्या वचनाला गुंतले मी राधा…..(2)
रात्रंदिवस तुझ्या आसनाला…..(2)
मोहनाsss माधवाsss गोविंदाsss
नको करू माझी मस्करी देवा
नको करू माझी मस्करी…..||1||
घागर घेवूनी पाणियासी जाता…..(2)
रोखून धरशी आमुच्या वाटा…..(2)
केशवाsss माधवाsss मोहनाsss
नको करू माझी मस्करी देवा
नको करू माझी मस्करी…..||2||
ऐका जनार्दनी पूर्ण कृपेने…..(2)
वाईट बाई तुझा कृष्ण मुरारी…..(2)
माधवाsss केशवाsss गोपालाsss
नको करू माझी मस्करी देवा
बंद कर तुझी बासरी…..||3||
श्रीहरीsss माधवाsss मोहनाsss
नको करू माझी मस्करी देवा
नको करू माझी मस्करी….
गवळण चाल ऐका:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste