राधा आलिया गोडीला येऊन बसलीया जोडीला
चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला ॥धृ॥
मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा
तुला सोडून राधिके मला तीळभर करमेना
कोणी सोडणार नाही गं राधा कृष्णाच्या जोडीला ||१||
मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा
भुललो गं राधीके तुझ्या गोऱ्या रंगाला
कोणी सोडणार नाही गं राधा कृष्णाच्या जोडीला ॥२॥
एका जनार्दनी ही गवळण राधा
नको खोट बोलू तू नंदाच्या कान्हाला
कोणी सोडणार नाही गं राधा कृष्णाच्या जोडीला ||३||