You are currently viewing रुतला पायी काटा कान्हाने काढीला (Rutla Payi Kata Kanhane Kadhila)

रुतला पायी काटा कान्हाने काढीला (Rutla Payi Kata Kanhane Kadhila)

  • Post author:
  • Post category:Gavlani

यमुनेच्या काठी घडा फोडीला…(२)
रुतला पायी काटा कान्हाने काढीला…(२)…||धृ.||

आशा मज त्या श्री कृष्णाची
होणार सून मी त्या यशोदाची
हात सोड माझा पदर उडाला…(२)
रुतला पायी काटा कान्हाने काढीला…(२)…||१||

पिचकारी मध्ये भरुनी रंग
नको रे कान्हा भिजेल माझं अंग
हात सोड माझा पदर उडाला…(२)
रुतला पायी काटा कान्हाने काढीला…(२)…||२||

निजले मी होते निजमंदीरी
अवचित आला तुझा मुरारी
हात सोड माझा पदर उडाला…(२)
रुतला पायी काटा कान्हाने काढीला…(२)…||३||

जनी म्हणे ऐशा रिती
समजाविते कान्हा प्रती
हात सोड माझा पदर उडाला…(२)
रुतला पायी काटा कान्हाने काढीला…(२)…||४||

यमुनेच्या काठी घडा फोडीला…(२)
रुतला पायी काटा कान्हाने काढीला…(३)


गवळण चाल ऐका: