Skip to content
गोकुळाला बाई गोकुळाला
लावी वेड तुझा कान्हा ||
नवनीत चोळी करी मस्करी
रंग भोरोनी मारी पिचकारी
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||1||
जमवुनी साऱ्या गोकुळच्या पोरी
नदी किनारी खेळे बा हरी
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||2||
एका जनार्दनी यशोदेचा कान्हा
कुठं वर सोसु मी याचा धिंगाणा
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||3||
चाल समजण्यासाठी व्हिडिओ पहा:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste