You are currently viewing किती पाहिल्या मी गवळणी (Kiti Pahilya me Gavlani)

किती पाहिल्या मी गवळणी (Kiti Pahilya me Gavlani)

  • Post author:
  • Post category:Gavlani

किती पाहिल्या मी गवळणी तु ग एकच नंबर,
कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर ॥धृ॥

या कुंजवनात तु ग पडली गळ्यात,
तुझे रंग रूप राधे कसे भरले डोळ्यात ||1||

तुझ्या मनात ग मन माझं कस बसलंय गुंतून,
निळ्या नभातल चंद्र सारे गन हे असमान ||2||

एका जनार्दनी गवळण, किती सांगू मी समजावून,
तुझ्या प्रेमासाठी राधे आलो गोकुळ सोडून ||3||