नको मारू रे कान्हा पिचकारी
साड़ी रंगान भिजल माझी साड़ी
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
कातू रागावला माझा वरी
गोकुळात जेव्हा तुझी माझी जोड़ी
नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी
कान्हा पड़ते रे पाया….
गवळनि मधे मी गवळन छोटी
तुझी वागनुक भल्तिच खोटी
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
चुगली सांगते माझा घरी
गोकुलात तुझी माझी झाली निंदा
सम्ध्यानी मला पहिलेच तिनदा
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
नवरा मारू देई पलंगावरी