You are currently viewing मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात भजन (तुझ्यासाठी आले वनात) lyrics

मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात भजन (तुझ्यासाठी आले वनात) lyrics

  • Post author:
  • Post category:Gavlani

मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात
तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात ||धृ||

तुझ्यासाठी सोडले घरदार
तुझ्यासाठी सोडिला संसार
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
तुझ्यासाठी आले वनात ||१||

तुझ्यासाठी केल्या मी एकादशी
तुझ्यासाठी राहिले उपवाशी
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
तुझ्यासाठी आले वनात ||२||

एका जनार्दनी विनवती राधा
शरण आले मी तुला गोविंदा
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
तुझ्यासाठी आले वनात ||३||


गवळण चाल ऐका: