जाऊदे घट भरण्या यमुनेला
मला रे अडवू नको नंदलाला !!धृ!!
घागर घेवूनी पानियाशी जाता
अडवू नको रे कान्हा अमुच्या वाटा
जाऊदे घट भरण्या यमुनेला
मला रे अडवू नको नंदलाला !!१!!
डोईवर माझ्या गोरक्षाचा माठ
हळूहळू चढते मी मथुरेचा घाट
जाऊदे घट भरण्या यमुनेला
मला रे अडवू नको नंदलाला !!२!!
एका जनार्दनी गवळण राधा
कृष्ण सख्याची चडली बाधा
जाऊदे घट भरण्या यमुनेला
मला रे अडवू नको नंदलाला !!३!!