You are currently viewing नको वाजवू श्री हरी मुरली (Nako Vajvu Shree Hari Murali)

नको वाजवू श्री हरी मुरली (Nako Vajvu Shree Hari Murali)

  • Post author:
  • Post category:Gavlani

नको वाजवू श्री हरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ ||

घरी करीत होते मी कामधंदा
तेथे मी गडबडली रे || १ ||

घागर घेवूनी पानियाशी जाता
दोही वर घागर पाजरली || २ ||

एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गवळण घाबरली || ३ ||


गवळण चाल ऐका: