neel kirit somayya

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पूत्र नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी झाली. नील सोमय्या हे भाजपचे नगरसेवक आहेत.

सध्या ज्या प्रकरणात नील सोमय्या यांची चौकशी सुरु आहे, ते प्रकरण बरेच जुनं आहे, अशी माहिती मुलुंडच्या पोलीस उपायुक्तांनी दिली. नील सोमय्या यांच्यावर त्यावेळी खंडणीचा कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र आज पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्याचं कळतंय.

आगामी काळात मुंबई पोलीस भाजप नगरसेवक नील सोमय्या यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून किरीट सोमय्या हे सातत्याने सरकारच्या त्रुटी शोधून काढत असतात. त्यांनी गेल्या काही काळात ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उकरून काढली आहेत. प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांची ‘ईडी’ चौकशी, तसेच मध्यंतरी अन्वय नाईक आणि रश्मी उद्धव ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराच्या मुद्द्यावरुन त्यांनी थेट शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांना अंगावर घेतले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून किरीट सोमय्या यांना आम्हीही तुमचे घोटाळे बाहेर काढू, असा इशारा देण्यात आला होता.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.