Anant Gite Raigad Loksabha

यावेळी अनंत गीते नावाचे तीन उमेदवार रायगड मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सारख्या नावाचे असेलेले उमेदवार उभे करायचे आणि विरोधकांच्या मतांचे विभाजन करून त्यांची कोंडी करायची अशी खेळी विरोधकांकडून याही वर्षी खेळण्यात आली आहे.



माजी केद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते पुन्हा एकदा रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ते उमेदवार असून, इंडिया आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी अनंत पद्मा गिते, आणि अनंत बाळोजी गीते नामक दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.



निवडणुकीच्या राजकारणात मतपत्रिकेवरील नावेच महत्वपुर्ण ठरतात. कारण चर्चेतल्या नावांचे भांडवल करून निवडणुका लढल्या जातात. रायगडकरांना सध्या याचाच प्रत्यय येतोय. अनंत गीते नावाचे तीन उमेदवार रायगड मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नामसाधर्म्य असेलेले उमेदवार उभे करायचे आणि विरोधकांच्या मतांचे विभाजन करून त्यांची कोंडी करायची अशी खेळी विरोधकांकडून खेळण्यात आली आहे.



२०१४ निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना याची मोठी किंमत चुकवावी लागली होती. सुनिल तटकरे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला ९ हजार ८४९ मत पडल्याने तटकरे यांचा गीतेंकडून अवघ्या २ हजार मतांनी पराभव झाला होता.

२००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत दोन ए. आर अंतुले नावाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत बॅरीस्टर ए. आर अंतुले यांचा विजय झाला असला तरी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या डमी अंतुलेंना २३ हजार ७७१ मत पडली होती.

१९९६ साली झालेल्या निवडणूकीत दत्ता पाटील नावाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीतही दत्ता पाटील नावाच्या दोन उमेदवारांनी निवडणूक लढविली होती.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.