uran dr babasaheb ambedkar jayanti

उरण दि १४(विठ्ठल ममताबादे)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती यंदा सालाबाद प्रमाणे १४ एप्रिल २०२४ रोजी उरण मध्ये उत्साहात साजरी झाली आहे.

राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेस वंदन करण्यासाठी बौद्धवाडा, सिद्धार्थ नगर, संघर्ष नगर मांगीरदेव येथे अध्यक्ष संजय गायकवाड, उरण आमदार महेश बालदी, उरण मुख्याधिकारी समीर जाधव, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम, मोरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक इंगोले, कामगार नेते रमेश ठाकूर , कौशिक शाह, रवी भोईर, जैवीन कोळी, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे कामगार नेते संतोष घरत, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या भावना घाणेकर, चिंतामण गायकवाड, सीमा घरत, यशवंत ठाकूर, रोहित पाटील, अमृत शेठ, भूपेन घरत, नंदकुमार पाटील,मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर , धनेश बोरे मनसे, उरण तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष घनःश्याम कडू , जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो तसेच दि उरण तालुका बार असोशिएशन चे अध्यक्ष ॲड विजय पाटील, ज्येष्ठ अधिवक्ता आणि माजी अध्यक्ष ॲड पराग म्हात्रे, खजिनदार ॲड अर्चना माळी, सदस्य ॲड प्रतिभा भालेराव, ॲड स्वाती कांबळे, ॲड निकिता कासारे, ॲड रेखा पाटील,ॲड श्रीधर कवडे, ॲड निवेदिता वाघमारे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढायचे. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. यामुळे मागासवर्गीय समाजसह इतर समाजातील नागरिकांसह अध्यक्ष संजय गायकवाड यांचा नेतृत्वाखाली राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक सिद्धार्थनगर बौद्धवाडा मोरा येथून उरण नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे येऊन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.



यावेळी अध्यक्ष संजय गायकवाड, यांच्यासह सिद्धार्थ नगर नागनाथ गजधाने उच्चपा दहिसर, राजरत्न गायकवाड, परशुराम शिवशरण, शबाना शर्वे, बसवराज दहिसर, धुळप्पा बनसोडे, प्रफुल साबळे, वाल्मिकी, सुनील कोल्हे, लख्खन गायकवाड, चंद्रकांत गजधाने, सुरज गजधाने, रतन साबळे, प्रकाश भोसले, ऍडव्होकेट सुभाष बनसोडे, दिनेश गायकवाड, संतोष मोघे, संघर्ष नगर मांगीर देव खलील शेख, लाल शेख, लक्ष्मण वाल्मिकी, दीपक साबळे, जयभीम झळकी, महेश कदम, बाबू दुर्गांना, हनुमंता पोतेनैऋ, दीपक बल्लूरंगी, प्रकाश धसाडे, सागर पोतेनेरु, सुभाष बुलंद, प्रशांत भागा, राकेश गायकवाड, रवी आरेकर, प्रकाश गुलद, स्वप्नील साळवे,एन जी एल गेट अध्यक्ष देवेंद्र कोळी, करण कांबळे, अमर कऱ्हाळे, हेमंत मुदर, अरविंद थोरात, खाजुद्दीन शेख, चारफाटा येथील भानुदास झिने, शैलेश मूलके, अशोक मूलके,लहू शिंदे, बौद्धवाडा विशाल कवडे, अनिल कासारे,धनेश कासारे, मंगेश कासारे, शिवाजी कासारे, सागर मोहिते, सुनील जाधव, कुणाल जाधव, मनोज ओव्हाळ, सतीश तायडे, आकाश कांबळे, विश्वनाथ जाधव, अमर गायकवाड ,आकाश कवडे, अनिकेत गायकवाड, साहिल गायकवाड, अतिश गायकवाड, महेश गायकवाड, आशिष गायकवाड, करण गायकवाड, दीक्षित गायकवाड आदींसह सिद्धार्थनगर मोरा, संघर्षनगर भवरा, मांगीरदेव, बौद्धवाडा, चारफाटा, एनजीएल गेट भीम नगर, सावित्री बाई फुले, नाईक नगर तसेच उरण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.